Video – पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या वाघांना घाबरले- संजय राऊत

पंतप्रधान मोदींचे सिंहाच्या छाव्यासोबत फोटो आहेत, ते छावे इजा करत नाही असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच पंतप्रधान मोदी यांना आमच्यासारख्या वाघांची त्यांना नेहमी भिती वाटत राहिली आहे. त्यांनी या वाघांवर पाठीमागून हल्ले केले असेही संजय राऊत म्हणाले.