
सामना ऑनलाईन । नगर
म्हणतात ना सापाला अनेक घर असतात तसाच काहीसा प्रकार नगरमधील सावेडी भागात घडला. सावेडी येथील शाहूनगर परिसरात दुचाकीमध्ये साप घुसला होता. दुचाकीत साप घुसल्याने लक्षात आल्यानंतर सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. त्यानंतर गाडी खोलून निसर्ग मित्रांनी साप पकडला आणि त्याला निसर्गात केला मुक्त केले. गाडीत घुसलेल्या या सापाला बाहेर काढण्यासाठी दोन तास लागले. तोपर्यंत सर्वांचीच बोबडी वळाली होती.
शाहू नगर भागात एका ठिकाणी साप निघाला होता. त्यास पकडून निसर्गात मुक्त करण्यासाठी निसर्गमित्र घेऊन जात असताना पोत्यात टाकलेल्या सापाने उडी घेतली ती थेट गाडीच्या डिक्कीत आणि मग तो थेट गाडीच्या आतमध्ये लपून बसला होता. त्यास सुखरूप बाहेर काढण्यासाठी निसर्गमित्रांना तब्बल दोन तास लागले. अखेर साप बाहेर काढून त्यास निसर्गात मुक्त करण्यात आले.
पाहा व्हिडीओ :



























































