Video – विद्याने घातलं कोडं, सोडवलं तर कळेल ‘शकुंतला देवी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख!

568

अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी शकुंतला देवी या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. हिंदुस्थानमधील मानवी कॉम्प्युटर म्हणून ओळख असलेल्या शकुंतला देवी यांच्या भूमिकेत विद्या बालन दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगण्यासाठीही विद्याने एक कोडं घातलं आहे. ते कोडं सोडवलं तर तुम्हाला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख कळणार आहे.

शकुंतला देवी या कॅलक्युलेटरची मदत न घेता मोठ मोठी गणितं सोडवायच्या. म्हणून शकुंतला देवी यांना मानवी कॉम्प्युटर ओळखले जात. यासाठी त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड बुकमध्येही नोंदवण्यात आले होते. याच शकुंतला देवींच्या भूमिकेत विद्या दिसणार आहे. शंकुतला देवी यांचे पती परितोष बॅनर्जी यांच्या भूमिकेत अभिनेता जीशू सेनगुप्ता दिसणार आहे. अनु मेनन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही एखाद्या गणितज्ञासारखी सांगण्यात आली आहे. विद्या बालन हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यात ती प्रेक्षकांना कोडं घालताना दिसत आहे. हे कोडं सोडवल्यानंतर तुम्हाला शकुंतला देवी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख कळणार आहे. मग व्हिडीओ पाहा आणि ओळखा ही तारीख!

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या