हा अभिनेता होणार विद्या बालनचा नवरा!

द डर्टी पिक्चर, कहानी, पा अशा चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री विद्या बालन सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचा शेवटचा चित्रपट मिशन मंगल बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. बॉबी जासूस, कहानी-2, बेगम जान, तुम्हारी सुलू असे काही फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर मिशन मंगलच्या यशामुळे विद्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सध्या ती शकुंतला देवी या गणितज्ञ महिलेच्या बायोपिकमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाचे काही पोस्टर्सही प्रदर्शित झाले आहेत. त्यात विद्याचा शकुंतला देवींच्या भूमिकेतला लूकही व्हायरल झाला आहे. आता शकुंतला देवींच्या पतीच्या भूमिकेवरूनही पडदा दूर झाला आहे. एक बंगाली अभिनेता ही भूमिका साकारणार आहे. जीशू सेनगुप्ता असं या अभिनेत्याचं नाव आहे.

मानवी संगणक अशी ओळख असलेल्या शंकुतला देवी यांचे पती परितोष बॅनर्जी यांच्या भूमिकेत जीशू सेनगुप्ता दिसणार आहे. जीशू आणि विद्या या दोघांनीही एनटीआर या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. परितोष यांची भूमिका आव्हानात्मक असून विद्यासारख्या अभिनेत्रीसोबत काम करायला मजा येत असल्याची प्रतिक्रिया जीशू याने दिली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू असून त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेचा खुलासा अद्याप झालेला नाही. 

आपली प्रतिक्रिया द्या