विद्या बालनचा ‘शेरनी’ओटीटीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या बहुतेक राज्यांत थिएटर बंद असल्याने बॉलीवूडचे चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’ या चित्रपटाचा प्रीमियर गतवर्षी ओटीटीवर झाला होता.

आता तिचा आणखी एक चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विद्याच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाचा ग्लोबल प्रीमियर पुढील महिन्यात होणार असल्याची घोषणा आज अॅमेझॉन प्राईम व्हिडिओने केली आहे. अमित मसुरकर दिग्दर्शित या चित्रपटात विद्या वन अधिकाऱयाच्या भूमिकेत झळकणार आहे. मध्य प्रदेशातील घनदाट जंगलात या चित्रपटाचे शूटिंग पार पडले. शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राज यांच्याही शेरनीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.