
विद्याविहार येथे गेल्या महिन्यात झालेल्या एका भीषण कार अपघातातील आरोपी अल्पवयीन मुलाला ‘बाल न्याय मंडळाने’ (ज्युवेनाईल जस्टीस बोर्ड) आज जामीन मंजूर केला. या अपघातात एका 33 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर त्याच्या पत्नीला जबर दुखापत झाली होती. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच मुंबई सत्र न्यायालयाने गाडीचे मालक असलेल्या या मुलाच्या वडिलांनाही जामीन मंजूर केला होता. 5 फेब्रुवारी रोजी विद्याविहार येथील सोमय्या कॉलेजजवळ अल्पवयीन मुलगा कार चालवत असताना त्याने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात उपचारादरम्यान ध्रुमिल यांचा मृत्यू झाला.

























































