मुंबई ते व्हिएतनाम फक्त 11 रुपयांत विमान कंपनीची भन्नाट ऑफर

बोरिवली ते चर्चगेट रेल्वेने प्रवास करायचा म्हटले तरी दहा रुपयांचे तिकीट आकारले जाते, पण विचार करा मुंबई ते व्हिएतनाम हा विमान प्रवास तुम्हाला केवळ 11 रुपयांत करता आला तर…विश्वास बसत नाही ना, पण हे खरंय. व्हिएतनामची विमान वाहतूक कंपनी व्हिएतजेट एअरने अनोखी ऑफर देऊन खळबळ उडवून दिली आहे.

या विमान वाहतूक कंपनीने 11 रुपयांची ऑफर जारी केली आहे. ही ऑफर दर शुक्रवारी उपलब्ध असून 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. कंपनीच्या ऑफरनुसार, हिंदुस्थानातून टॅक्स आणि फीशिवाय फक्त 11 रुपयांत तिकीट मिळेल. टॅक्स अन् फीची रक्कम भरावी लागेल. ही तिकिटे इकोनॉमी क्लाससाठी उपलब्ध असतील. ही ऑफर मर्यादित सीटसाठी राखीव असेल. मुंबई, दिल्ली, कोच्ची आणि अहमदाबाद येथून व्हिएतनामच्या हो ची मिन्ह सिटी, हनोई आणि दा नांग येथे जाण्यासाठी www.vietjetair.com या वेबसाईटवरून तिकीट बुकिंग करता येईल.