किळसवाणे; पोलिसांनी जप्त केले साडेतीन लाख वापरलेले कंडोम, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

कचऱ्यातील प्लास्टिक, धातूच्या वस्तू, भंगार वेचणारे आपण अनेकदा बघतो. मात्र कचऱ्यातून कंडोम उचलून त्याचा काळाबाजार करणाऱ्यांबद्दल ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. हो हे खरं आहे. वापरलेले कंडोम धुवून पुन्हा नव्याने पॅक केले जात असून बाजारात विक्रीला येत आहेत. अशाच वापरलेल्या कंडोमच्या रॅकेटचा नुकताच पर्दाफाश झाला आहे.

विएतनाम देशातील बिन डाँग प्रांतातील हो मिन्ह सिटीजवळील एका कारखान्यातून पोलिसांनी वापरलेले कंडोम मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत. या कारखाण्यात काही कामगार वापरलेले कंडोम धुत होते तर काही ठिकाणी कंडोमचे पॅकिंग सुरू होते. या प्रकरणी कारखान्याच्या मालकाला पोलिसांनी अटक केली असून त्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या वापरलेल्या कंडोम्सला आधी उकळलेल्या पाण्यात टाकले जाते. तिथे मशीने त्याला धुतले जाते. त्यानंतर हे कंडोम दुसऱ्या मशीनमधून सुकवले जातात. त्यानंतर ते पुन्हा पॅक केले जातात. आतापर्यंत अशा प्रकारचे हजारो कंडोम विकले असल्याची कबूली कारखान्याच्या मालकाने दिली आहे. हे कंडोम अनेक हॉटेल्समध्ये पुरवले गेल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या