
ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोना संसर्ग झाला असून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केंकरे यांना गेल्या आठवडाभरापासून ताप येत आहे. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सुरुवातीला त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले होते. मात्र त्यांचा ताप कमी होत नसल्याने त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले. केंकरे यांच्या आई ललिता केंकरे यांचे नुकतेच निधन झाले आहे. तेव्हापासून ते घरीच होते.

























































