अस्सल शौकीन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ नाटय़कर्मी विजय केंकरे. घरी, बाहेर अस्सल खाण्याचे दर्दी. अट्टल मासेखाऊ.

  •  ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? : खाणं म्हणजे माझ्यासाठी जगणं.
  • खायला काय आवडतं? : सगळं. विशेषतः मांसाहारी. त्यातही मासे जास्त आवडतात.
  • खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? : बिलकूल घेत नाही. म्हणजे खूप खायचं आणि जमेल तेवढा आणि जमेल तेव्हा व्यायाम करायचा.
  • डाएट करता का? : अजून तरी अजिबात नाही.
  • आठकडय़ातून किती वेळा बाहेर खाता? : बऱ्याचदा सकाळचं खाणं बाहेर होतं.
  • कोणत्या हॉटेलमध्ये जायला आवडतं? : बॉम्बे कॅण्टीनमध्ये ‘फ्यूझन फू’, ‘पो पेद्रो’ या हॉटेलमध्ये पोर्तुगीज, गोवन अशा पद्धतीचं जेवण मिळतं. बीकेसीमधलं ‘बोटिको’ हॉटेल मला आवडतं. कोल्हापुरातलं ‘परख ढाबा’, पुण्यातलं ‘आशा डाएनिंग हॉल’मधील शाकाहारी जेवण, ‘फिश करी राईस’मधलं कारवारी जेवण, दादरमधील ‘जिप्सी चायनीज’, ‘जिप्सी कॉर्नर’, ‘हाका सान’ हे चायनीज रेस्टॉरंट आणि ‘ग्लोबल फ्यूझन’ येथे मी सुशी खायला जातो.
  • कोणतं पेय आवडतं? : चहा.
  • प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? : नाटकात काम करायचो तेव्हा बऱ्याच ठिकाणी रात्रीचं जेवणं चांगलं मिळायचं. दौऱ्याला गेल्यावर गावांमध्ये नाश्ता कुठे चांगला मिळतो, अशा जागा शोधायचो.
  • नाटकाच्या दौऱ्यादरम्यान आवडलेला खास पदार्थ? : नागपूरचं सावजी, कोल्हापुरातलं पांढरा-तांबडा रस्सा, गोक्यातले छोटे मासे, पापलेट, सुरमई, बांगडा, रावस, करंदी, घोळ.
  • स्ट्रीट फूड आवडतं का? : भरपूर आवडतं. आरसीएफ चेंबूरला जाऊन पाणीपुरी खायचो. गिरगावातील ताराबागेतील पाणीपुरी तिथे खास जाऊन खायचो.
  • घरी केलेल्या स्वयंपाकात काय आकडतं? : घरी केलेलं काहीही आवडतं. माझी पत्नी अतिशय सुंदर स्वयंपाक करते. ती खेकडे फार उत्तम बनवते.
  • पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा काय खाऊ घालता? : अर्थात मासे. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींमध्ये घातलेलं मटन म्हणजे खिचडा पदार्थ माझी पत्नी उत्तम बनवते. अजून एक आवडणारी गोष्ट म्हणजे पाया सूप. तो बनवण्यासाठी आम्ही घरी विनय येडेकरला बोलवतो.
  • उपवास करता का? : नाही. लंघनही करत नाही.
  • स्वतः बनवू शकता अशी डिश आणि त्याची रेसिपी? : काहीही बनवता येत नाही.