
लंडनमध्ये 70वा वाढदिवस दणक्यात हॉलिहुड अभिनेत्यासह अनेक जण उपस्थित बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या 70 व्या वाढदिवसाची पार्टी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी लंडन येथील स्वतःच्या घरी ठेवली. या बर्थ डे पार्टीला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोग्राफर जिम रिडेल यांनी या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना म्हटले की, विजय मल्ल्या यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जी शानदार पार्टी आयोजित केली, त्याबद्दल ललित मोदी तुम्हाला मनापासून धन्यवाद. जिम यांच्या पोस्टला ललित मोदी यांनी उत्तर दिलेय, माझे प्रिय मित्र विजय मल्ल्या यांच्या वाढदिवसाआधी माझ्या घरी आल्याबद्दल आणि पार्टीचा आनंद घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. या पार्टीला हॉलीवूड अभिनेता इद्रिस एल्बा, फॅशन डिझायनर मनोविराज खोसला आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मुजुमदार शॉ आदी उपस्थित होते.


























































