मल्ल्याच्या अडचणीत वाढ

16

सामना प्रतिनिधी, मुंबई

मद्यसम्राट विजय मल्ल्या याची मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात विशेष पीएमएलए न्यायालय सुरू असलेल्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज स्पष्ट नकार दिला. स्थगिती देण्यासारखे कोणतेही सबळ कारण दिसत नसल्याने न्यायालय मल्ल्याची मागणी मान्य करू शकत नाही असे न्यायमूर्ती अकील कुरेशी आणि न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केल्याने मल्ल्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

हिंदुस्थानी बँकांचे नऊ हजार कोटी रुपये थकवून परदेशात पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या याची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करून सरकारजमा करण्याची प्रक्रिया मुंबईतील पीएमएलए विशेष न्यायालयात सुरू आहे. या प्रक्रियेला मल्ल्याची हरकत आहे. त्यामुळे त्याने या प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अशी विनंती करणारा अर्ज गेल्याच महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता, परंतु हा अर्ज आज फेटाळण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या