
सामना ऑनलाइन ,लंडन
शुक्रवारी नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना गोलंदाज खलील अहमदच्या चेंडू हातावर आदळल्याने अष्टपैलू विजय शंकर वेदनांनी कळवळत होता. पण शनिवारी त्याच्या हाताचे स्कॅनिंग केल्यानंतर हाताला फ्रॅक्चर नसल्याचे स्पष्ट झाले. शंकरची दुखापत गंभीर नसल्याचे उघड झाल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा लाभला आहे. हिंदुस्थानची सलामीची विश्वचषक क्रिकेट लढत येत्या 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.



























































