अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारली. त्यावरून महायुती सरकारला आपल्याच आमदारांच्या मागणीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यांना कंत्राटदार आणि घोटाळेबाजांसाठी वेळ आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
एक्सवर पोस्ट करून वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी आमदारांना न्याय मिळत नसेल तर जनतेला या सरकारने अडीच वर्षात काय न्याय दिला असेल हे आता स्पष्ट आहे. तसेच मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांना आणि सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला ज्या आदिवासी आमदारांनी पाठिंबा दिला, आज त्यांच्यासाठी दोघांकडे वेळ नाही. वेळ आहे तो फक्त इव्हेंट- ब्रॅण्डिंग,कंत्राटदार आणि घोटाळेबाजांसाठी अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
सत्ताधारी आमदारांना न्याय मिळत नसेल तर जनतेला या सरकारने अडीच वर्षात काय न्याय दिला असेल हे आता स्पष्ट आहे.
मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांना आणि सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला ज्या आदिवासी आमदारांनी पाठिंबा दिला, आज त्यांच्यासाठी दोघांकडे वेळ नाही.
वेळ आहे तो फक्त… pic.twitter.com/Gn7GzogiNh
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 4, 2024