कालच्या प्रकाराने संपूर्ण जगभरात महाराष्ट्राची बदनामी झाली – विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानभवनात झालेल्या राड्यावर संताप व्यक्त केला आहे. सभागृहात बोलत असताना त्यांनी या प्रकारामुळे संपूर्ण देशभरात महाराष्ट्राची बदनामी झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले.

”विधानसभेचा आजचा शेवटचा दिवस. महाराष्ट्राच्या विधानसभेचं नावलौकीक, पावित्र्य याबाबत कालच अध्यक्षांनी विधानभवनात सांगितले. त्यानंतर इथे अंतिम आठवडा प्रस्तावानंतर सभागृहाबाहेर लॉबीत हा प्रकार घडला. या प्रकारामुळे फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरात यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली’, असे वडेट्टीवार म्हणाले.