‘विजयदुर्ग‘च्या बुरुजाची पडझड रोखा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुरातत्त्व खात्याला निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गप्रेमी आणि मुळातच छायाचित्रकाराची शोधक नजर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज किजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीचे वृत्त इन्स्टाग्रामवर टिपले आणि केंद्रातील भारतीय पुरातत्व खात्याला किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीसाठी पावले उचलण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील गडकोट किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या घडामोडींबाबत सजग असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज इन्स्टाग्रामवर विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिह्यातील जलदुर्गाच्या एका बुरुजाची पडझड झाल्याचे लक्षात आले. या पोस्टची तत्काळ दखल घेत त्यांनी पुरातत्त्व खात्याला याबाबत माहिती कळविण्याचे तसेच पडझड रोखण्यासाठी आणि या दुर्गाच्या देखभालीबाबतही केंद्राकडील या खात्याकडे पाठपुरावा करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना त्यांनी सूचना दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या प्रयत्नामुळे विजयदुर्गच्या या बुरूजाची पडझड रोखणे शक्य होणार आहे. तसेच या जलदुर्गाच्या देखभालीचा मार्गही आणखी सूकर होणार आहे. गडकोट, किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. ते जतन करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतल्याने दुर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.