
महायुतीत सर्वकाही आलबेल नसून रोजच नेत्यांमध्ये खटके उडत आहेत. अशातच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नंदूरबार मतदारसंघाचे आमदार विजयकुमार गावित यांनी मिंधे गटाच्या आमदारांवर हल्ला चढवला आहे. मिंध्यांच्या आमदारांची मस्ती जिरवायची असे म्हणत गावित यांनी त्यांची कुंडलीच बाहेर काढली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र गावागावात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून नेत्यांनी फील्डिंगही लावली आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी मिंधे गटाचे आमदार आमश्या पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर हल्ला चढवला.
माझ्या टार्गेटवर दोन जण आहेत. एक आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि दुसरे आमदार आमश्या पाडवी. दोघांना मस्ती आली असून त्यांची जिरवायची आहे, असे गावित म्हणाले. यावरून महायुतील वाद विकोपाले गेल्याचे दिसून येत आहे. यावेळी गावित यांनी आमश्या पाडवी यांनी जमवलेल्या संपत्तीची कुंडलीही मांडली.
आमश्या पाडवी यांच्या नावावर 12 प्लॅट आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावावर 4 बंगले आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा आणि राज्य सरकारच्या शबरी घरकूल योजनेचाही त्यांनी लाभ घेतला आहे, असा गौप्यस्फोट गावित यांनी केला. तसेच मिंध्यांचे आमदार युतीत राहून नेहमी विरोध करता, आता त्यांना जागा दाखवणार. त्यांना सोडणार नाही, असेही गावित यांनी म्हटले.
भाजपचे फुके म्हणाले शिंदे गटाचा बाप मीच! फडणवीसांची सारवासारव