
हिंदुस्थानने सेमीकॉन इंडिया 2025 कॉन्फ्रेन्समध्ये देशाचा पहिला स्वदेशी 32-बिट स्पेस प्रोसेसर ‘विक्रम 3201’ लाँच केला. हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि चंदिगड येथील सेमीकंडक्टर लॅबोरेटरी (एससीएल) यांनी मिळून हा प्रोसेसर तयार केला आहे. हा एक 32-बिट मायक्रोप्रोसेसर आहे. याला खास करून अंतराळ मिशनच्या कठीण परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी बनवले आहे. विक्रम 3201 ची आधीच पीएसएलव्ही-सी60 मिशनमध्ये चाचणी केली आहे. विक्रम3201 ने पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपीरिमेंटल मॉडय़ुल (पीओईएम-4) च्या मिशन मॅनेजमेंट कॉम्प्युटरला यशस्वीपणे हाताळले आहे. इस्रोने या वर्षी मार्च 2025 मध्ये ‘विक्रम 3201’ सोबत कल्पना 3201 नावाचा दुसरा प्रोसेसरसुद्धा लाँच केला होता.