हृतिकचा चौकार! ‘विक्रम वेधा’च्या रिमेकमध्ये चार वेगवेगळ्या भूमिकांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता हृतिक रोशन आगामी काळात साऊथच्या लोकप्रिय ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. यात हृतिक एक, दोन नव्हे तर तब्बल चार वेगवेगळ्या भूमिकांत पाहायला मिळणार आहे. सारं काही सुरळीत झालं तर जून महिन्यात शूटिंगला सुरुवात होणार आहे. भूमिकेसाठी हृतिक बनारसी भाषा शिकणार असून उच्चार स्पष्ट असावेत यासाठी सेटवर प्रशिक्षक असणार आहेत. चित्रपटात हृतिकच्या लूकवर बरेच प्रयोग केले जात आहेत. त्याचे वेधाचे पात्र तरुण वयापासून ते गुन्हेगारी जगतात अधिपत्य गाजवण्यापर्यंतचे वेगवेगळ्या रूपात दाखवले जाणार आहे. ‘धूम-2’नंतर तो पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

‘विक्रम वेधा’चे 40 टक्के चित्रीकरण मुंबईत होणार आहे, तर उर्वरित 60 टक्के चित्रीकरण हे लखनऊ, बनारस आणि यूपीत होईल.