
गुहागर तालुक्यातील असगोली जिल्हापरिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी प्रचारात मुसंडी मारली असून गेल्या पाच वर्षांत त्यांनी केलेल्या विकासाकामांमुळे जनता त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे. विक्रांत जाधव यांच्या प्रचारात त्यांच्या मातोश्री सुवर्ण जाधव आणि बहिण नगरसेविका कांचन शिंदे उतरल्या आहेत. त्या माय- लेकी घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून असगोली गटातून विक्रांत जाधव आणि पंचायत समिती गणातून उर्वी खैरे निवडणूक लढवत आहेत. त्यांचा प्रचार करताना नगरसेविका कांचन शिंदे म्हणाल्या की, असगोली गटात १३ गावे आहेत. त्या १३ गावातील प्रत्येक घरात जसे आमदार भास्कर जाधव गेले आहेत तसेच त्यांच्या पावलावर पाऊल टाकत विक्रांत जाधव हे प्रत्येक घरात पोहचले आहेत.त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे ते निश्चित विजयी होतील. सुवर्णा जाधव यांनी आपला मुलगा विक्रांत जाधव आणि दोन्ही पंचायत समिती गणातील उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी गुहागर संघटिका सिध्दी सुर्वे,विभागप्रमुख श्रावणी पेडणेकर,उपविभाग प्रमुख सिध्दी नरळकर,सरपंच दिव्या वनकर, शाखा संघटिका सुषमा शितप, सुचिता शितप, आशा शितप, माजी सरपंच विश्लेशा कोलगे, मुखेश नवरत,सुशील मोरे, सचिन गावडे, सुनील घाणेकर, संतोष चव्हाण, दीपक साटम, श्रीकांत पेडणेकर उपस्थित होते.






























































