हाती लागलेल्या बिबट्याला हालहाल करून मारले, गावातून काढली धिंड

929

आसामच्या गुवाहाटी येथे बिबट्याने रहिवासी क्षेत्रात प्रवेश केला आणि काही लोकांनी त्याला मारहाण केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही लोक बिबट्याच्या मृतदेहाला बांधून गावात धिंड काढताना दिसत आहेत. तसेच बिबट्या मारल्याचे सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. दरम्यान, या लोकांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडून बिबट्याच्या प्रेताची कातडी काढून त्याचे दात उपटून टाकले.

दरम्यान व्हायरल व्हिडिओत दिसलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सहभागी झालेल्या इतरांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. स्थानिक लोक सांगतात की वनविभागाने वेळीच कारवाई केली असती तर ही घटना टाळता आली असती.

रविवारी पहाटे पाच वाजता अडकलेल्या बिबट्याविषयी माहिती मिळाली होती, अशी माहिती वनविभागाने दिली आहे, परंतु ते घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तो तेथून पळून गेला. यानंतर काही स्थानिकांनी त्याच्यामागे जाऊन त्याला ठार केले.

आपली प्रतिक्रिया द्या