
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली/अमृतसर
मानावाला आणि अमृतसरदरम्यान रावण दहनाच्या कार्यक्रमाप्रसंगी घडलेल्या भीषण दुर्घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या गावकऱ्यांनी ट्रेन चालकाचा आपण ट्रॅकवर गर्दी पाहताच आपत्कालीन ब्रेक दाबून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण संतप्त जमावाने दगडफेक केल्यामुळे पुन्हा गाडीचा वेग वाढवला हा दावा फेटाळून लावला आहे.
कालच्या भीषण रेल्वे दुर्घटनेत 62 जणांचा बळी गेला आहे. या अपघाताचा प्रत्यक्ष साक्षीदार नगरसेवक शैलेंदर सिंग (46) म्हणाला की ट्रेन ड्रायव्हर खोटे बोलतोय. त्याने गर्दी बघून गाडीचा वेग कमी केलाच नव्हता. ट्रेनच्या चाकाखाली अनेक ग्रामस्थ चिरडले गेले होते. अशा दुःखद प्रसंगात आम्ही गावकरी ट्रेनवर दगडफेक करण्याच्या मनस्थितीत कसे बरे असू, हा माझा सवाल आहे.
summary- villagers says driver didnt put emergency break


























































