मंडळ कार्यालय विजयी; भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या क्रिकेट स्पर्धेला उदंड प्रतिसाद

174

भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या वतीने नंदकुमार शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नॅशनल इन्शुरन्समधील कर्मचाऱयांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला दणदणीत प्रतिसाद लाभला. मंडळ कार्यालय 10 संघाने अंतिम फेरीत मुंबई क्षेत्रीय कार्यालय दोन या संघावर मात करीत जेतेपदावर मोहर उमटवली.

या स्पर्धेतील सामने कर्नाटक स्पोर्टस् असोसिएशन ग्राऊंड, क्रॉस मैदान, चर्चगेट, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी. एल. सोनकर, मुंबई कॉर्पोरेट ऑफिसचे मुख्य क्षेत्रीय प्रबंधक शुभंकर पाइन, क्षेत्रीय प्रबंधक आर. कला, भारतीय विमा कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष रमेश मयेकर, भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाचे खजिनदार व कार्यकारी चिटणीस संजय डफळ, स्थानीय लोकाधिकार महासंघाच्या चिटणीस अर्चना राणे यांच्या हस्ते झाले.

बक्षीस वितरण समारंभासाठी शिवसेना खासदार व सचिव अनिल देसाई, शिवसेना उपनेते व आमदार रवींद्र मिर्लेकर, क्रिकेट समीक्षक व ज्येष्ठ पत्रकार द्वारकानाथ संझगिरी, भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस व नवी मुंबईचे उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, सहाय्यक महाव्यवस्थापक बी. एल. सोनकर, मुख्य क्षेत्रीय प्रबंधक पाईन, न्यू इंडिया एश्योरन्स स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, नॅशनल इन्शुरन्स स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणस हेमंत सावंत, कार्याध्यक्ष किशोर तारे, सचिन खानविलकर, विमा कामगार बँक संचालक नाशिक युनिटचे अध्यक्ष बशीर शेख हे मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या