
सामना प्रतिनिधी । मुंबई
6 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया विनू मांकड क्रिकेट स्पर्धेसाठी (19 वर्षांखालील) मुंबईच्या संघात अर्जुन तेंडुलकरची निवड करण्यात आली असून वेदांत मूरकरची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुवेद पारकर उपकर्णधार म्हणून भूमिका बजावेल. मुंबईसमोर सलामीला गुजरातचे आव्हान असेल. त्यानंतर मुंबईला बंगाल, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यांचा सामना करावा लागणार आहे.
मुंबईचा चमू – वेदांत मूरकर (कर्णधार व यष्टीरक्षक), सुवेद पारकर (उपकर्णधार), प्रग्नेश कनपिल्लेवार, दिव्यांश सक्सेना, सागर छाब्रीया, अक्षत जैन, अर्सालन शेख, हाशीर दाफेदार, वैभव काळमकर, अथर्व अंकोलेकर, आकाश शर्मा, अर्जुन तेंडुलकर, उझेर खान, अथर्व पुजारी, आर्यन बढे




























































