
रामनवमीच्या दिवशी दंगली घडवून आणण्याचा पॅटर्न सुरूच असून छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ मुंबईतील मालवणीतही गुरुवारी रात्री राडा झाला. रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान दोन गटांत हिंसाचार उफाळून आला. याप्रकरणी सुमारे 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे.
मालाड मालवणी येथे गुरुवारी रामनवमीला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. काही अनुचित घटना घडू नये म्हणून या वेळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. ही यात्रा गेट नंबर-5 येथून जात असतानाच त्याला आक्षेप घेत घोषणाबाजी करण्यात आली तसेच चप्पलफेक करण्यात आली. डीजेचा आवाज अधिक असल्याने वादाची ठिणगी पडल्याचे सांगण्यात येत आहे.
चप्पलफेक, दगडफेकीमुळे तणाव
– चप्पलफेक तसेच दगडफेक करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली. गर्दीला पांगवण्यासाठी तसेच जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. त्यात काही जण जखमी झाले आहेत.
– या राडय़ाला धार्मीक रंग लागू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली. लाठीमाराचे तसेच जखमींचे पह्टो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आले होते. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी तत्काळ ते हटवण्यास सांगितले तसेच हा कंटेंट अन्यत्र शेअर न करण्याबाबत समज दिली.
– वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत मालवणीत तळ ठोकून होते. खबरदारी म्हणून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. ज्या मार्गावरून शोभायात्रा जात होती तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओग्राफी तपासली जात आहे. अनुचित प्रकार ज्यांनी घडवून आणला आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
– अजय बन्सल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ 11
चप्पलफेक, दगडफेकीमुळे तणाव
– चप्पलफेक तसेच दगडफेक करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली. गर्दीला पांगवण्यासाठी तसेच जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. त्यात काही जण जखमी झाले आहेत.
– या राडय़ाला धार्मिक रंग लागू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली. लाठीमाराचे तसेच जखमींचे पह्टो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात आले होते. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी तत्काळ ते हटवण्यास सांगितले तसेच हा कंटेंट अन्यत्र शेअर न करण्याबाबत समज दिली.
– वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत मालवणीत तळ ठोकून होते. खबरदारी म्हणून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
300 जणांवर गुन्हे, 21 अटकेत
सरकारी कामात अडथळा आणणे, बेकायदा कृत्य करणे या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 300 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली असून या सर्वांना बोरिवली न्यायालयाने 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सीसीटीव्ही, ड्रोन, व्हिडिओग्राफीचे फुटेज पोलीस तपासत आहेत.
– शोभायात्रेवर दगडफेक करणाऱया समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत संतप्त जमाव मालवणी पोलीस स्टेशनवर जमा झाला होता. कारवाईचे आश्वासन देत पोलिसांनी जमावाला शांत केले.
किराडपुऱयातील दंगेखोर ओहरमध्ये! मिरवणुकीवर दगडफेक
किराडपुऱयात राडा करून दंगलखोरांनी शहराजवळच्या ओहर या गावात आश्रय घेतला. ओहरमध्येही रामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेक करून हे दंगेखोर पसार झाले. दंगेखोरांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचीही विटंबना केली. दंगेखोरांच्या दगडफेकीत गावातील 10 ते 15 जण जखमी झाले आहेत.



























































