
चार धाम यात्रेतील केदारनाथ मंदिराबाबत उत्तराखंड सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केदारनाथ मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहेत.
उत्तराखंडमधील चारधाम यात्रा सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. मात्र इतक्या कमी काळात तब्बल 28 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. चार धाम पैकी केदारनाथला सध्या सर्वात जास्त गर्दी आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिल्यांदाच केदारनाथ जवळ एनडीआरएफ व आईटीबीपीची पथकं तैनात केली आहेत.
”चार धाम मार्गावर एनडीआऱएफ, आयटीबीपी, एसडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. गरज लागली तर लष्कारालाही पाचारण करण्यात येईल. तर गर्दी वाढत असल्याने आता रजिस्ट्रेशन शिवाय लोकांना दर्शन दिले जात नाहीए. ज्यांचे रजिस्ट्रेशन असेल त्यांनाच दर्शन दिले जात आहे”, असे उत्तराखंडचे मुख्य सचिव एसएस संधू यांनी सांगितले आहे.
























































