
सामना ऑनलाईन, बीड
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आमदार सुरेश धस यांचा एक व्हिडीओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते ‘ मै हूं डॉन ‘ गाण्यावर नाचताना दिसतायत. आष्टी इथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आष्टीच्याच खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. स्पर्धेत आष्टीच्याच मुलामुलींचे संघ विजयी झाले आहेत.
नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होतं. ते झाल्यानंतर स्टेजवर असलेल्या सुरेश धस यांना नाचण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा मै हूं डॉन गाणं लावण्यात आलं होतं. नाचायचा आग्रह केल्यामुळे सुरेश धस यांनी नाचायला सुरूवात केली. त्याचा हा व्हिडीओ असून हा व्हिडीओ बराच पाहिला जातोय.






























































