
सध्या रणवीर सिंहचा बहुचर्चित चित्रपट धुरंधर-2ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने अवघ्या चारच दिवसांत जगभरात 700 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटर मालकांनी शो वाढवले आहेत. धुरंधर चित्रपट पाहण्यासाठी एक महिला थेट थिएटरमध्ये लॅपटॉप घेऊन गेल्याचे दिसत आहे. या महिलेने थिएटरमधूनच वर्क फ्रॉम होम ऐवजी थिएटर केल्याचे दिसत आहे. याचा एक फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. बंगळुरूमध्ये संपूर्ण थिएटर भरलेले दिसत असून यात ही महिला लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. या तिच्या फोटोवर नेटकऱयांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. रात्री 11 च्या शो दरम्यान ही महिला काम करत असल्याने कॉर्पोरेटमधील लाइफस्टाइलवरही अनेकांनी कमेंट केल्या आहेत. वर्क फ्रॉम सिनेमा हॉल… अशा कमेंटही काहींनी केल्या आहेत.





























































