
विरार ते अलिबाग या बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 22 हजार 250 कोटी हुडकोकडून कर्जरूपाने घेण्यास मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मागणीनुसार या कर्जासाठी शासन हमी देण्यात येईल. एकूण 1 हजार 130 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावयाचे असून एकूण 215.80 हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 2 हजार 341 कोटी 71 लाख रुपये निधी देण्यात आला आहे.
























































