
हिंदुस्थानचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी रविवारी कुटुंबासह अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. तसेच हनुमान गढी मंदिरातही ही जोडी नतमस्तक झाली. राममंदिरात जाण्यापूर्वी हे सेलिब्रिटी जोडपे हनुमान गढी मंदिरात आले होते, असे हनुमान गढी मंदिराचे महंत संजय दास यांनी सांगितले. विराट आणि अनुष्काने महंतांसोबत अध्यात्मावर चर्चाही केली. या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विरुष्काशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संवाद टाळला.