कुंबळेचा पत्ता विराटनेच कट केला! डायना एडुल्जींचा गौप्यस्फोट

18

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनिल कुंबळेला प्रशिक्षक पदावरून हटवा, अशी मागणी करणारे सात ई-मेल बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी यांना पाठवले होते. प्रशासकीय समितीचा याला नकार होता. मात्र बीसीसीआय विराट कोहलीच्या मागणीसमोर झुकले आणि रवी शास्त्री कोच झाले. पुरुष संघासाठी बीसीसीआयने आपले नियम पायदळी तुडवले. पण महिला संघासाठी कडक नियम अमलात आणले जात आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौर व स्मृती मंधाना यांना रमेश पोवार प्रशिक्षक म्हणून हवा असेल तर त्यात गैर काय, असे स्पष्ट मत प्रशासकीय समिती सदस्या डायना एडुल्जी यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या