कोहलीचा ‘विराट’ विक्रम; सचिन, धोनीलाही टाकले मागे

1037

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पुण्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने दिवसअखेर तीन बाद 273 धावा केल्या. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवला तेव्हा कर्णधार विराट कोहली 63 आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे 18 धावांवर नाबाद होते. पहिल्या दिवशी विराटसह पुजारने अर्धशतक आणि मयांक अग्रवालने मालिकेतील सलग दुसरे शतक ठोकले.

#INDvSA मयांक अग्रवालचे सलग दुसरे शतक, हिंदुस्थान सुस्थितीत

पहिल्या दिवशी ठोकलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विराटने आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आफ्रिकेविरुद्ध सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज विराट ठरला आहे. विराटने याबाबतीत सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनीलाही मागे टाकले आहे.

विराट कोहली कर्णधार म्हणून 50वा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात विराटने नाबाद 63 धावा केल्या. कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिका विरोधात विराटने सर्वात जास्त 600 धावा केल्या आहेत. विराटने तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने कर्णधार म्हणून आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 553 धावा केल्या होत्या. तर, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. धोनीने कसोटीमध्ये कर्णधार म्हणून 461 धावा केल्या आहेत.

आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे कर्णधार –

  • विराट कोहली – 600* धावा
  • सचिन तेंडुलकर – 553 धावा
  • महेंद्रसिंग धोनी – 461 धावा
आपली प्रतिक्रिया द्या