#INDvSA मयांक अग्रवालचे सलग दुसरे शतक, हिंदुस्थान सुस्थितीत

2820
mayank-agarwal

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसरी कसोटी पुण्यात सुरू आहे. टीम इंडियाचा सलामीवीर मयांक अग्रवालने कसोटीच्या पहिल्या दिवशी कारकीर्दीतील सलग दुसरे शतक साजरे केले. फिलेंडरच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत अग्रवालने शतकाला गवसणी घातली.

दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शतकी खेळी करणारा रोहित 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारमध्ये 100 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान पुजाराने आणि अग्रवालने अर्धशतक पूर्ण केले. पुजारा मोठी खेळी करणार असे वाटत असताना अर्धशतकानंतर 58 धावांवर बाद झाला.

पुजारा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. त्यावेळी मयांक नव्वदीत खेळत होता. अखेर 57 व्या षटकात फिलेंडरच्या चेंडूवर चौकार ठोकत अग्रवालने सलग दुसरे शतक ठोकले. शतकानंतर तो 108 धावांवर बाद झाला.

आपली प्रतिक्रिया द्या