
सध्या देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून वाद सुरू आहे. अनेक राज्यांनी या कायद्याला विरोध केला आहे. अनेक ठिकाणी या कायद्याविरोधात हिंसक आंदोलनं होत असून आतापर्यंत दहाहून अधिक जणांचा या आंदोलनात मृत्यू झाला आहे. देशात या कायद्याचे समर्थन व विरोध करणारे दोन गट पडले आहेत.
या कायद्याबात टीम इंडियाचा कर्णधार विरोट कोहली याची प्रतिक्रीया पत्रकारांना विचारली. त्यावेळी त्याने मला याबाबत कोणतेही बेजबाबदार वक्तव्य करायचे नाही असे सांगितले आहे. ‘ज्या विषयावर देशात दोन प्रकारचे मतप्रवाह बनले आहेत. त्या प्रकरणी मला बिलकूल बेजबाबदारपणे वक्तव्य करायचे नाही. मला या विषयाची पूर्ण माहिती व अभ्यास करणे गरजेचे आहे. हा कायदा काय आहे, यामुळे काय होणार आहे. असे समजून घेतले पाहिजे त्यानंतरच मी यावर प्रतिक्रीया देण्यासाठी जबाबदार असेन’, असे विराट कोहली याने सांगितले.























































