
सामना प्रतिनिधी । गुडसूर
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गुडसुर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिराची यात्रा 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान भरणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी ह.भ.प. बाबुराव महाराज गुडसुरकर यांचे किर्तन, 19 तारखेला ह.भ.प.शिवाजी महाराज भवानी बिजलगावकर यांचे किर्तन व सकाळी भव्य पशूरोग निदान व उपचार शिबीर, 20 तारखेला सकाळी 7 वाजता भजनी मंडळ व बाल भजनी मंडळ यांच्या साथीने विठ्ठलनामाच्या गजरात रथ पालखी नगर प्रदक्षिणा व दहिहंडीचा कार्यक्रम व दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत जंगी कुस्त्याचा कार्यक्रम आहे. याचा गुडसुर व गुडसूर परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे यात्रा कमीटीने अवाहन केले आहे.



























































