
विटीदांडू कोकणातील गल्लीबोळातला खेळ आता कुठेतरी हरवून गेलाय. क्रिकेटच्या वाढत्या प्रभावामुळे हे पारंपरिक खेळ मागे पडत चालले आहेत.विटीदांडू सारख्या पारंपरिक खेळाला नवसंजीवनी देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व कोतवडे जिल्हा परिषद गट मालगुंड शाखा आयोजित मराठी मातीतील विटी दांडू स्पर्धेचे मालगुंड येथे आयोजन करण्यात आले होते. विटीदांडूची स्पर्धा आयोजित करण्याचा आगळा-वेगळा प्रयत्न शिवसैनिकांनी केला.पहिल्याच स्पर्धेत तब्बल १२ संघ सहभागी झाले होते.
काळानुसार मागे पडलेल्या विटी दांडू या खेळाला पुनर्जीवित करण्याचे काम मालगुंड शिवसेना शाखेमार्फत करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन शिवसेना विभाग प्रमुख आणि माजी पंचायत समिती सभापती उत्तम मोरे यांच्या हस्ते पार पडले. शिवसेना उप तालुकाप्रमुख प्रकाश जाधव, माजी तालुकाप्रमुख राजेंद्र शिंदे युवासेना तालुका समन्वयक साईनाथ जाधव युवासेना उपतालुका रोहित साळवी, मालगुंड शाखाप्रमुख बावा आग्रे, नेवरे शाखा प्रमुख नाथा मोरे, मालगुंड शाखा संघटक वसंत फडकले,उपशाखाप्रमुख हरिनाथ शिवगण,जगन सुर्वे,अरुण पवार, गावकर संतोष शिवगण, सागर मांडवकर, महेश फडकले सुशांत हुमणे उपस्थित होते तसेच अंतिम तीन संघांना पारितोषिक तसेच चषक माजी सभापती उत्तम मोरे व मालगुंड माजी उपसरपंच संतोष चौगुले यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.




























































