
दूरसंचार कंपनी व्होडाफोनची सर्व्हिस डाऊन झाल्याचा चांगलाच फटका लाखो ग्राहकांना रविवारी बसला आहे. ग्राहकांना कॉलिंगसह इंटरनेट वापरात अडचणी येत असल्याने #vodaphonedown असा हॅशटॅग वापरून ग्राहकांनी सोशल मिडीयावर आपला संताप व्यक्त केला.रविवारी सकाळपासून लखनऊ, मुंबई, अहमदाबाद अशा काही शहरांमधून ट्विटरवर ग्राहकांनी तक्रारी केल्या. तर काहींनी यावर भन्नाट मिम्स देखील व्हायरल केले. रविवारी संध्याकाळनंतर पुन्हा नेटवर्क सुरळीत झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला.




























































