नाशिक बंदला हिंसक वळण; दोन गटांत दगडफेक, गाड्यांची तोडफोड

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला नाशिकमध्ये हिंसक वळण लागले. सकल हिंदू समाजाने काढलेल्या रॅलीवेळी जुने नाशिकमधील पिंपळचौक, म्हसरूळ टेक, दूध बाजार परिसरात दगडफेक, वाहनांची तोडपह्ड करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला करीत अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. या भागात सशस्त्र्ा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाने आज शहरात बंद पुकारला होता. दुपारी रॅली जुने नाशिक परिसरात पोहोचली. तेथील पिंपळ चौक भागातील काही दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर दोन गट समोरासमोर आले. दगडफेक करून सरकारी योजनेचे फलक फाडण्यात आले. एका भाजपा कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. यावेळी दगडफेकीत मारुती कार, बोलेरोसह दुचाकाचे नुकसान झाले.

दरम्यान, पोलीस पथकांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर तणाव निवळला. तोच जुने नाशिक येथील म्हसरूळ टेक भागात दोन गटांनी परस्परांवर दगड, तसेच काचेच्या बाटल्या फेकल्या. यात काहीजण जखमी झाले. घरे, दुकाने आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले.

पोलिसांची अतिरिक्त कुमक, शीघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाले. अश्रूधुराच्या नळकांडय़ा पह्डून, लाठीचार्ज करून त्यांनी जमावाला पांगवले. बॅरिकेडींग करण्यात आले. सायंकाळी उशीरापर्यंत बंदोबस्त तैनात असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

जळगावात मोर्चाला हिंसक वळण

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱया अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने जळगाव बंद पुकारण्यात आला होता. या वेळी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राम होंडा हे दुचाकीचे शोरूम उघडे असल्याचे पाहून जमावाने त्यावर दगडफेक केली.