अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर 9 मार्चला मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर 9 मार्च रोजी चर्चेनंतर मतदान होणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध महत्त्वाचा ठरणार आहे. ओम बिर्ला हे पक्षपाती आहेत. संसदेच्या चालू अधिवेशनात बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिले नाही. तसेच महिला खासदारांकडून मोदींवर हल्ल्याचा प्रयत्न झाला असा संभ्रम पसरवला. त्यास आक्षेप घेऊन विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे.