
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आज (गुरुवार) जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने जिह्यातील गावा-गावांमध्ये प्रचार पदयात्रा, रॅली व मोठय़ा गावांमध्ये जाहीर सभा असा प्रचाराचा धुरळा उडत होता. दरम्यान, शनिवारी (दि. 7) मतदान प्रक्रिया पार पडणार असून, सोमवारी (दि.9) निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
सोलापुरात जि. प. 68 गट, 136 गणांसाठी निवडणूक
सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गट व जिह्यातील 11 तालुक्यांच्या पंचायत समितीच्या 136 गणांची निवडणूक होत आहे. यासाठी जि.प.च्या 68 जागांसाठी 271, तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 485 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यातील त्या-त्या स्थानिक नेतृत्वाची कसोटी लागलेली आहे. 11 तालुक्यांत होणाऱ्या मतदानासाठी 2758 मतदान केंद्रे असून, 7500 बॅलेट युनिट 3366 कंट्रोल युनिट वापरण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी 24 लाख 59 हजाग्र 227 मतदार आहेत.
साताऱयात 22 लाख मतदार, मतदानाचा हक्क बजाकणार
सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गट क पंचायत समितीच्या 130 गणांसाठी खंडाळा तालुक्यातील 98 हजार 291, फलटण 2 लाख 53 हजार 227, माण 1 लाख 75 हजार 451, खटाक 2 लाख 40 हजार 169, कोरेगाक 1 लाख 98 हजार 768, काई 1 लाख 39 हजार 433, महाबळेश्वर 36 हजार 257, जाकली 92 हजार 1, सातारा 2 लाख 80 हजार 351, पाटण 2 लाख 73 हजार 556, कराड 4 लाख 6 हजार 606 असे मिळून जिह्यात 21 लाख 94 हजार 110 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सातारा जिह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 2 हजार 877 मतदान केंद्रे आहेत. सुमारे 21 लाख 94 हजार 110 मतदार या मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत.
मार्कर नव्हे; बोटावर, शाईने करणार निशाणी
दि. 7 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकांसाठी आता मतदारांच्या बोटावर मार्करने निशाणी करण्यात येणार नाही, तर शाईच लावली जाणार आहे. त्यामुळे शाई पुसली गेली, अशा तक्रारी येऊ नयेत, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने खबरदारी घेतली आहे. मार्करऐवजी शाई बोटाला लावण्यात येणार आहे. ही शाई म्हैसूर येथून मागवण्यात आली आहे.
कोल्हापुरात 2691 मतदान केंद्रे
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 गट आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी 2691 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी 6975 मतदान यंत्रे सज्ज ठेवली आहेत. जिह्यात एकूण 23 लाख 40 हजारांहून मतदार आहेत. 14 हजार कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे.
सांगलीत 18 लाख मतदार
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 18 लाख 18 हजार मतदार मतदान करणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 8979 कर्मचारी नियुक्त केले आहेत.





























































