भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

मुलुंड पश्चिम हनुमान पाडा येथील वन खात्याच्या जमिनीवरील घराची भिंत दुसऱया घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. लक्ष्मीबाई कटाडे (40) असे या मृत महिलेचे नाव आहे. तर या दुर्घटनेत रघुनाथ कटाडे (50) हे जखमी झाले असून त्यांच्यावर अगरवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.