बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न करायचंय, नोकरी द्या!

परीक्षेत पास होण्यासाठी आणि नोकरीसाठी अर्ज करताना कोण काय लिहील याचा नेम नाही. सध्या एका तरुणाचा अर्ज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. टेक्निकल मॅनेजर पदासाठी या तरुणाने अर्ज केला असून अर्जात म्हटले की, मला माझ्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत लग्न करायचे आहे. त्यामुळे तुम्ही मला नोकरी द्या. या तरुणाचा नोकरी अर्ज पाहून सीईओसुद्धा हैराण झाले. मला वाटते की, या पदासाठी आवश्यक असलेली क्षमता माझ्याकडे आहे. तसेच मी ती पूर्ण करतो. परंतु जर मला नोकरी मिळाली नाही तर मला माझ्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत लग्न करता येणार नाही. माझ्याकडे नोकरी असेल तर मी तिच्याशी लग्न करू शकेन, असेही या तरुणाने अर्जात म्हटले आहे. कंपनीच्या सीईओने हा अर्ज सोशल मीडियावर शेअर केला आहे.