वॉर्डमधील कंट्रोल रुम हायटेक, सुविधांचे विकेंद्रीकरण करणार!

315
सर्व फोटो - संदीप पगडे

देवेंद्र भगत | मुंबई

मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सक्षम असून मुंबईकरांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहे. ही सेवा आणखी परिणामकारक करण्यासाठी सुविधांचे विकेंद्रीकरण करून डिजिटल वायरलेस, ‘एसएमएस’ आणि अत्याधुनिक यंत्रणा राबवून वॉर्डमधील कंट्रोल रूम ‘हायटेक’ करण्याकर भर देणार आहे. जेणेकरून आपत्कालीन स्थितीत बचावकार्य आणखी वेगाने करणे करून जीवित-वित्तहानी टाळण्यास मदत होईल! पालिकेच्या आपत्कालीन विभागप्रमुखपदी नियुक्ती झालेल्या डॉ. प्रभात रहांगदळे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना आपल्या ‘ऍक्शन प्लॅन’ची माहिती दिली.

प्रश्न : आपत्कालीन विभागाच्या जबाबदारीचे आव्हान वाटते का?

उत्तरआव्हान तर आहेच! मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबईत काम केल्याचा अनुभव आणि गेल्या पाच वर्षांपासून अग्निशमन दलाच्या प्रमुख पदावर काम करताना मोठय़ा संकटांचा, आपत्तींचा सामना केल्यामुळे या आव्हानाचा सामना नक्कीच यशस्वीपणे करण्याचा विश्वास आहे! युनायटेड नेशन्स डिझास्टर्स असोसिएशन कोऑर्डिनेशनमध्ये काम केल्याचा अनुभवही नवी जबाबदारी पार पाडताना उपयोगी ठरेल.  

प्रश्न : आपत्कालीन विभागात कोणते बदल आवश्यक वाटतात?

उत्तर मुंबईकरांना विविध समस्यांबाबत तक्रार करण्यासाठी ‘1916’ या क्रमांकासह वेबसाईट, ट्विटर, व्हॉट्स ऍप क्रमांकही आहेत. त्यामुळे तुर्तास बदल न करता आवश्यकतेनुसार व्याप्ती वाढकून मुंबईकरांना जास्तीत जास्त सोयिस्वर सुविधा देण्याला प्राधान्य राहणार आहे. कोणत्याही ठिकाणी दुर्घटना घडल्यास संबंधित वॉर्डमधूनच तातडीने बचावकार्याची सुविधा मिळेल यासाठी या ठिकाणची यंत्रणा सक्षम करणार आहे. यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव तयारही आहे. याची लवकरचच अंमलबजावणी होईल.

प्रश्न : इतर विभागांची जबाबदारी कशी पार पाडणार!

उत्तर आपत्ती व्यवस्थापनासह क्रीडा संकुल, तरण तलाव आणि या संकुलांच्या व्यवस्थापनासाठी विश्वस्त मंडळे, सुरक्षा खाते, मुद्रणालय आणि नाटय़गृहांची जबाबदारी पार पाडण्यासाठी लवकरचच आढावा घेऊन आवश्यक त्या सर्व सुधारणा, मुंबईकरांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. कोरोनाच्या प्रभावात कर्मचारी काम करीत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करून खबरदारीही घेतली जात आहे.

प्रश्न : मुंबईत धोकादायक इमारती, दरडी, भिंतींचा धोका टाळण्यासाठी वाय करणार?

उत्तर धोकादायक इमारती, दरडींच्या, भिंतींच्या ठिकाणी दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेकडून वेळोवेळी सर्केक्षण-तपासणी करून  धोका असल्यास संबंधित रहिवाशांना नोटीस दिली जाते. अतिधोकादायक ठिकाणच्या रहिवाशांना तातडीने स्थलांतर करण्यास भाग पाडले जाते. या पार्श्वभूमीवर संबंधित धोकादायक ठिकाणी राहणाऱया रहिवाशांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्वतःहून वेळीच आवश्यक कार्यवाही केली पाहिजे. जेणेकरून दुर्घटना घडल्यास जीवित-वित्तहानी होणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या