कचरा हाताळणीतून अर्थप्राप्ती करा- लोबो

262

प्राथमिक वापरानंतर टाकून दिलेली कोणतीही वस्तू हा कचरा असतो. जर योग्य दृष्टिकोन बाळगला, तर आपण अशा कचर्‍यापासून अर्थप्राप्ती शकतो, असे प्रतिपादन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो यांनी शुक्रवारी साळगाव येथे केले. गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनने एसआयएनटीईएफएफ, सीपीडब्लूडी आणि आयएल अँड एफएस अकॅडमी ऑफ अप्लाईड डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने साळगांव येथील गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन इमारतीत आयोजित केलेल्या गोव्यातील पर्यावरण अनुकूल हाताळणी आणि पुन:प्राप्ती, बांधकाम आणि विध्वंस कचरा यावरील कार्यशाळेचे उद्घाटन केल्यावर ते विभागप्रमुखांना मार्गदर्शन करत होते.

या प्रसंगी हेन्रिक विड्थ, डेप्युटी कॉन्सुल जनरल, रॉयल नॉर्वेजियन कॉन्सुलेट जनरल, मुंबई, डॉ. ख्रिश्चन इंगलसन, वरिष्ठ वैज्ञानिक, एसआयएनटीईएफएफ, डॉ. गौरव भाटियानी, सीओओ, आयएल अँड एफएस आणि आयएल अँड एफएस अकॅडमीचे डीन आणि लेव्हिन्सन मार्टिन्स, व्यवस्थापकीय संचालक, गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन, हे उपस्थित होते. लोबो यांनी सांगितले की, गोवा स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी, बायंगिणी आणि काकोडा येथील सांडपाणी प्रकल्पांवरील काम प्राथमिकतेने हाती घेतले पाहिजे. स्वच्छ गोव्याच्या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करत लोबो यांनी म्हटले, घरगुती कचरा, रेस्तराँ, बांधकाम, हॉटेल्स, इमारती आणि कॉलनी येथून निघणार्‍या कचर्‍यावर सर्वप्रथम प्रक्रिया झाली पाहिजे. बायंगिणी आणि काकोडा प्रकल्प कार्यान्वित होतील, तेव्हाच हे शक्य होईल, असे ते म्हणाले. जगभरात राज्याची स्वच्छ प्रतिमा राखण्यास मदत होईल, जे पर्यटकांना अधिक संख्येने आकर्षित करेल. म्हणून जनतेने अशा स्वच्छ, हरित आणि पर्यावरण अनुकूल प्रकल्पांना विरोध करू नये असे ते म्हणाले.

इतर देशांमध्ये कचरा नसतो, कारण ते त्याला उर्जा म्हणून वापरतात. असा सकारात्मक दृष्टिकोन गोव्यातील लोकांच्या मनात तयार झाला पाहिजे. जो शुष्क कचरा आपल्याला गोवाभर पसरलेला दिसतो. त्याच्यासाथी एसआयएनटीईएफएफ एक चांगला उपाय पुरवेल, असे ते म्हणाले.दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत तांत्रिक, संचालनात्मक आणि पर्यावरणीय पैलू, व्यवसाय आणि धोरणात्मक बाजू आणि मानके व गुणवत्ता नियंत्रण यांवर मान्यवर व्यक्तींची विविध सत्रे झाली.

आपली प्रतिक्रिया द्या