बुऱ्हानगरमध्ये पुरेसा पाणीपुरवठा करणार; शिवसेना जिल्हाप्रमुखांचे आश्वासन

बुऱ्हानगर येथे येणारे प्रादेशीक पाणी योजनेचे पाणी काही लोकप्रतिनिधी शेतीसाठी वापरत असल्यामुळे येथील नागरिकाना 15 दिवसातून एकदा पाणी मिळते. यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायत निवडणुका संपल्यावर लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थाचे हक्काचे पळवलेले पाणी बंद करून नागरिकाना पुरेसा पाणी पुरवठा करणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यानी सांगितले.

बु्ऱ्हानगर येथे ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. राहुरीच्या माजी नगरध्यक्षा उषा तनपुरे यांच्याहस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गाडे म्हणाले बुऱ्हानगर येथे ग्रामपंचायतीची निवडणुक लागली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुक महत्वाची असते. बुऱ्हानगर येथे महाविकास आघाडीने आठ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. ते विजयी होणार आहेत. विधानसभेत महाआघाडीने विरोधकांना जागा दाखवली. आता  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही 56 पैकी 50 ग्रामपंचायती ताब्यात घेणार असल्याचे गाडे यावेळी म्हणाले.

यावेळी नगराध्यक्ष अनिता पोपळघट,माजी महापौर भगवान फुलसौंदर, आप्पासाहेब कर्डीले, दिलीप सातपुते , बाळासाहेब बोराटे , सचिन शिंदे, अमोल येवले , संग्राम शेळके , सागर गायकवाड , विशाल वालकर , अमोल जाधव , रोहिदास कर्डीले, देविदास कर्डीले उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या