राजापूरच्या गंगातीर्थाचा मार्ग बंद; गर्दी टाळण्यासाठी निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूरचे गंगेचे बुधवारी सकाळी आगमन झाले आहे. राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील तीर्थावर गोमुखातून गंगामाईचे बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आगमन झाले आहे. गंगामाईच्या आगमनाबाबतचे वृत्त पसरले असून येथे गर्दी टाळण्यासाठी गंगातीर्थाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना राजापूरच्या गंगेचे दर्शन घेता येणार नाही. तसेच गंगेत स्नानही करता येणार नाही. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. गेल्यावर्षी 25 एप्रिलला गंगा अवतीर्ण झाली होती, त्यानंतर 24 जूनला ती अंतर्धान पावली होती. त्यावेळी तिचा कालखंड 60 दिवसांचा होता. निर्गमनानंतर नऊ महिन्यांनी गंगामाईचे आगमन झाले आहे.