कोरोना महामारीच्या काळात जागतिक तापमानवाढ ‘ग्लोबल वॉर्मिंग’ मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. जे कोरोना काळात शक्य झाले, ते नेहमीच्या जीवनातही शक्य आहे, असे सांगत शास्त्रज्ञांनी जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. त्याचे पालन केल्यास तापवाढ नियंत्रणात आणता येईल, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
ग्लोबल वॉर्मिंग 1.5 अशांपर्यत मर्यादीत करण्याचे लक्ष्य सध्या तरी दूर असल्याचे दिसत आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी जागतिक स्तरावर व्यापक प्रयत्न करावे लागतील, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सध्या वातारणातील कार्बन उत्सर्जनात आवश्यक घट करण्यात यश येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नेचर जियोसायन्स (Nature Geoscience) जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात शास्त्रज्ञांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना काळात 2020 मध्ये जागतिक स्तरावर कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात 6.3 टक्के म्हणजे सुमारे 2,200 मेट्रिक टनाची घट झाली होती, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
सिंघुआ यूनिवर्सिटी अर्थ सिस्टममधील वैज्ञानिक झू लियू यांनी सांगितले की, या काळात कार्बन उत्सर्जनातील ही घट आतापर्यंतची सर्वात मोठी घट आहे. 2009 मधील जागतिक मंदी आणि दुसऱ्या महायुद्धातील काळापेक्षाही ही घट मोठी आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्था आणि आपल्या जीवनशैलीत अनेक बदल झाले आहेत.
कोरोना काळात झालेल्या बदलांकडे लक्ष देत कार्बन उत्सर्जनातील घट करण्यात यश आल्यास जागितक तापमानवाढ नियंत्रणात येईल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. तसच तापमानवाढ 1.5 अशांपर्यंत नियंत्रित करण्याचे लक्ष्य गाठता येईल, असेही त्यांनी सांगितले. कोरोना काळात कार, ट्रक आणि इतर वाहनांच्या उत्सर्जनात एकतृतीयांशापेक्षा जास्त घट झाली. सध्याच्या काळात वाहनांवर मर्यादा घालण्यापेक्षा अपारंपारिक उर्जास्रोतांचा वापर केल्यास समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
हे लक्ष्य गाठण्यात यश आल्यास ग्लोबल वॉर्मंगपासून मानवाला असलेला धोका 40 टक्क्यांनी कमी होईल, असी दावाही लेखात करण्यात आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामाबाबत निष्कर्ष काढण्यासाठी शास्त्रज्ञांनी 21 जलवायु मॉडेलचा वापर केला. त्यात तापमानवाढीचा वेग कायम राहिल्यास पृथ्वीवरील अनेक भागांना मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल. पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होईल. हे सर्व टाळण्यासाठी जागतिक स्तारावर व्यापक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


























































