जे वनविभागाला जमले नाही, ते आम्ही करू बोईसरच्या वाळवेत तरुणांनी उभारला वन्यप्राण्यांसाठी पाणवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाच्या प्रचंड झळांनी लाहीलाही होत असल्याने बोईसरच्या डोंगरपायथ्याशी असलेल्या वाळवे भागात तरुणांनी एकत्र येत वन्यप्राण्यांसाठी पाणवठा उभारला आहे. त्यामुळे पाण्यासाठी बिबटे, तरस, माकडांची शहराकडे होणारी धाव थांबली असून जंगलातच मिळणाऱ्या पाण्यांमुळे त्यांची तहान भागू लागली आहे.
उन्हाचा प्रचंड तडाखा वाढत असतानाच जंगलाला वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे तेथील पाणवठे नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात असलेले वन्यप्राणी गावात घुसखोरी करू लागले आहेत. याकडे ग्रामस्थांनी बोईसर वनविभाग अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधले. मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले.

अखेर जे वनविभागाला जमले नाही ते आम्ही करून दाखवू असा निर्धार करत वाळवे गावातील भूषण साने, सूरज घरत, तुषार पावडे, किशोर पावडे, यतिन देसले, राहुल दळवी, अभिषेक दळवी, प्रणय दळवी, संदेश पावडे यांनी एकत्र येत वाळवेच्या जंगलात मोठा वनविभाग प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत एकीकडे स्थानिक तरुणांनी पदरमोड करून वन्यप्राण्यांसाठी पाणवठे निर्माण करून त्यांचे प्राण वाचवले असतानाच वनविभाग आणि स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी येणारा कोट्यवधींचा निधी जिरतो तरी कुठे, असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.

पाणवठा खोदला. पाणी जिरून जाऊ नये म्हणून त्या भल्यामोठ्या पाणवठ्यात ताडपत्री अंथरली. त्यांच्या या प्रयत्नांना वैशाली स्टोन क्रशरचे मालक संदीप अधिकारी यांनी साथ देत पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले.