हा फक्त कल, 12 पर्यंत थांबा निकाल तर आम्हीच लावणार- भाजप

33

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाच राज्यांच्या निकालात काँग्रेसने आघाडी घेतल्याचं पहिलं चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके-ढोल वाजवून दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असले तरी भाजप आपल्या विजयावर ठाम आहे. हा तर पहिला कल आहे. 12 वाजल्यानंतर हे चित्र बदलेलं असेल. अजून मतमोजणी सुरू झाली. त्यामुळे जसजसे फेऱ्या वाढतील तसतसे भाजप पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करील, असा विश्वास वृत्तवाहिन्यांवर चर्चेस आलेल्या भाजपच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला आहे.

मध्य प्रदेशमध्ये तसेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मध्यप्रदेशात मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून काँग्रेस सुस्साट वेगाने आघाडीवर होती. मात्र 9:30 नंतर भाजपने मध्यप्रदेशात आघाडी घेतली.

गेल्या काही निवडणुकांमध्ये देखील हा ट्रेंड पाहाण्यात आला होता की, आधी भाजप विरोधीपक्ष पुढे असतात. त्यांच्या जल्लोष सुरू होतो. मात्र 12 नंतर भाजप पुन्हा वेगाने पुढे येतो. त्यामुळे संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत सर्वांनाच धाकधूक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या