वेब न्यूज – ज्यूस जॅकिंगचा धोका

1750

>> स्पायडरमॅन

वाढत्या तंत्रज्ञानाच्या जोडीनेच या तंत्रज्ञानाच्या मदतीने फसवणुकीचे गुन्हे करणारे सायबर हल्लेखोरदेखील सध्या फसवणूक करण्यासाठी रोज नवनवे मार्ग शोधत आहेत. या सायबर हल्लेखोरांनी सध्या असाच एक नवा मार्ग शोधला आहे तो म्हणजे ‘ज्यूस जॅकिंग’ होय. तुम्ही जर कधी सार्वजनिक ठिकाणच्या चार्ंजग USB Port चा वापर करून आपला फोन चार्ज केला असेल, तर कदाचित तुम्ही या हल्ल्याचे शिकार झालेलेदेखील असू शकता. लॉस एंजलिसच्या काऊंटी जिल्हा अटॉर्नीच्या कार्यालयाने नुकत्याच या धोक्यासंदर्भात सावधगिरीचा इशारा दिला आहे. सायबर हल्लेखोर या सार्वजनिक ठिकाणच्या चार्ंजग USB Port चा वापर करून तुमच्या मोबाईलमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करतात आणि त्यानंतर तुमचे ई-मेल्स, फोटो, कॉन्टॅक्ट, पासवर्डस, बँकेची संवेदनशील माहिती असे सगळे काही चोरून नेतात. सध्या फार व्यापक प्रमाणात हा धोका पसरलेला नसला, तरी जसेजसे सार्वजनिक ठिकाणच्या यूएसबी पोर्ट चार्जर्सचा वापर वाढत जाईल, तसतसा हा धोकादेखील वाढत जाणार आहेत. या सार्वजनिक ठिकाणच्या चार्जर्सला असलेल्या यूएसबी पोर्टचा सायबर हल्लेखोर फार बेमालूमपणे वापर करत आहेत. यूएसबी वायर ही एकाचवेळी चार्ंजग आणि डाटा ट्रान्सफर दोन्हीसाठी उपयोगी असल्याने तिच्या याच उपयोगाचा गैरफायदा घेत, हे सायबर हल्लेखोर तुमच्या चार्ंजगला लावलेल्या मोबाईलमध्ये मालवेअर किंवा गुह्याला मदत करणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात. केवळ साठ सेकंददेखील यासाठी पुरेशी असतात. त्यानंतर मग तुमच्या फोनमधली संवेदनशील माहिती चोरणे किंवा फोन लॉक करणे आणि त्यानंतर हा डाटा परत देण्यासाठी किंवा फोन अनलॉक करण्यासाठी पैशाची मागणी करणे या मार्गाचा हे हल्लेखोर वापर करत आहेत.

ज्यूस हॅक झाल्याचे कसे ओळखावे?

  • बॅटरीच्या वापरामध्ये अचानक वाढ होणे किंवा बॅटरी लवकर संपणे
  • डिव्हाईस नेहमीपेक्षा हळू काम करायला लागणे किंवा कोणतीही सूचना न देता रिस्टार्ट होणे.
  • ऍप्स लोड होण्यास बराच वेळ घेणे किंवा वारंवार क्रॅश होणे.
  • मोबाईल नेहमीपेक्षा जास्त गरम होणे.
  • डिव्हाईस सेटिंग्जमध्ये आपोआप बदल होणे.
आपली प्रतिक्रिया द्या